Shiposhi Land Dispute: शिपोशी जाधववाडी येथे जमीन वादातून शेजाऱ्यांमध्ये जोरदार मारहाण; परस्परविरोधी तक्रारींवरून दोघांवर गुन्हा दाखल

Shiposhi Land Dispute: शिपोशी जाधववाडी येथे जमीन वादातून शेजाऱ्यांमध्ये जोरदार मारहाण; परस्परविरोधी तक्रारींवरून दोघांवर गुन्हा दाखल

पती-पत्नीसह तिघेजण जखमी; लांजा पोलिसांकडून दोन्ही बाजूंनी गुन्हे नोंद

लांजा : Shiposhi Land Dispute (शिपोशी जमीन वाद) अंतर्गत जमीन-जागेच्या वादातून शेजारी-शेजारी राहणाऱ्या दोघांमध्ये भांडण होऊन एकमेकांना मारहाण व शिवीगाळ केल्याची घटना शिपोशी जाधववाडी येथे बुधवार, २५ नोव्हेंबर रोजी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेत तिघेजण जखमी झाले असून, दाखल झालेल्या परस्परविरोधी तक्रारीनुसार लांजा पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीकांत धोंडू जाधव (वय ५५, रा. शिपोशी जाधववाडी, लांजा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार २५ नोव्हेंबर रोजी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास राहत्या घरासमोर मुलगा श्रवण कामाला जात नसल्याने त्यावरून पत्नी व मुलाला शिवीगाळ सुरू होती. दरम्यान, संजय शंकर डाफळे याने वडिलांकडून जमीन फसवून घेतल्याचा उल्लेख केल्याने त्याचा राग येऊन संजय डाफळे याने शिवीगाळ व दमदाटी करत हातातील काठीने श्रीकांत जाधव यांच्या डोक्यावर व पाठीवर मारहाण केली. भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पत्नी श्रावणी यांनाही काठी लागल्याने हात-पायाला दुखापत झाली व दोघे पती-पत्नी जखमी झाले.

Shiposhi Land Dispute: परस्परविरोधी तक्रारी व गुन्हा नोंदवण्याचा तपशील
या प्रकरणी दोन्ही बाजूंनी लांजा पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या असून, घटनेचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे आहे:

Arihant 1

श्रीकांत जाधव यांच्या फिर्यादीनुसार कारवाई: संजय शंकर डाफळे (वय ५२, रा. शिपोशी जाधववाडी, ता. लांजा) याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), १३१ तसेच संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय डाफळे यांची फिर्याद व कारवाई: श्रीकांत जाधव याने २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास दारू पिऊन शिवीगाळ व ठार मारण्याची धमकी दिली; गुरे गोठ्यात बांधून घरी जात असताना पाठीमागून डोक्यात कोयती मारून दुखापत केल्याच्या फिर्यादीवरून श्रीकांत जाधव याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), १३१ तसेच संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास: या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल उर्मिला शेडे करीत आहेत.