Chiplun Guhagar Road: चिपळूण-गुहागर मार्गावरील खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात; पालकमंत्री उदय सामंत यांच्या आदेशानंतर कार्यवाही

Chiplun Guhagar Road: चिपळूण-गुहागर मार्गावरील खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात; पालकमंत्री उदय सामंत यांच्या आदेशानंतर कार्यवाही

खड्ड्यांमुळे प्रवाशांची होणारी गैरसोय दूर; गुहागर युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून पालकमंत्र्यांचे आभार

गुहागर : Chiplun Guhagar Road (चिपळूण-गुहागर मार्ग) या अत्यंत वर्दळीच्या मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवासी आणि वाहनचालकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. या समस्येची दखल घेत गुहागर युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे रस्ता दुरुस्तीची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत पालकमंत्री उदय सामंत यांनी संबंधित प्रशासकीय यंत्रणेला तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश दिले असून, त्यानुसार चिपळूण-गुहागर मार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष देऊन तातडीने कार्यवाही केल्याबद्दल गुहागर युवासेनेच्या वतीने पालकमंत्री उदय सामंत यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत. तसेच चिपळूण व गुहागर परिसरातील प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी केलेल्या या कार्यवाहीबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले आहे.

Chiplun Guhagar Road दुरुस्तीप्रसंगी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते
या वेळी विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते:

Unity aster

गुहागरचे सभापती प्रणव पोळेकर

गुहागर तालुकाप्रमुख दीपक कनगुटकर

शहरप्रमुख नीलेश मोरे

चिपळूण तालुकाप्रमुख रूपेश घाग

गुहागर विधानसभा संपर्कप्रमुख सागर गुजर

अमरदीप परचुरे, विक्रांत चव्हाण, प्रणय घाग

चिपळूण तालुका संघटक ऋषिकेश साळवी

कुणाल देसाई, मंगेश मते, अमोल गोयथळे आदी