Sanjay Raut Delimitation Bill: डिलिमिटेशन बिलावरून संजय राऊत यांचा भाजपवर हल्लाबोल; “सत्ता हिरावून घेण्यासाठी रचलेला कट”

Sanjay Raut Delimitation Bill: डिलिमिटेशन बिलावरून संजय राऊत यांचा भाजपवर हल्लाबोल; "सत्ता हिरावून घेण्यासाठी रचलेला कट"

३० नोव्हेंबरपासून संसदेचे विशेष अधिवेशन, काँग्रेस खासदारांची २९ नोव्हेंबरला बैठक

मुंबई : Sanjay Raut Delimitation Bill (संजय राऊत डिलिमिटेशन बिल) च्या मुद्द्यावरून राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. केंद्रातील भाजप सरकारने ३० नोव्हेंबर रोजी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले असून, लोकसभेचे अधिवेशन ३० नोव्हेंबर ते ३ डिसेंबरपर्यंत तर राज्यसभेचे अधिवेशन २ डिसेंबर ते ३ डिसेंबर असे दोन दिवस चालणार आहे. याच अधिवेशनात सरकार डिलिमिटेशन बिल सादर करण्याची शक्यता असताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सोशल मीडियावर (ट्विट करत) भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.

संजय राऊत यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्यात नाहीत; शरद पवार हे प्रकृती अस्वस्थ असल्याने संघर्ष आणि निर्णय घेण्याच्या स्थितीत नाहीत, नाहीतर राष्ट्रद्रोही डिलिमिटेशन बिल अशा भ्रष्ट पद्धतीने संसदेत आणण्याचे धाडस झाले नसते."

Sanjay Raut Delimitation Bill: राऊतांचे गंभीर आरोप आणि विरोधकांची हालचाल
संसदेच्या विशेष अधिवेशनापूर्वी डिलिमिटेशन बिलाच्या शक्यतेने विरोधकांमध्ये हालचाली वाढल्या असून, या घडामोडींतील महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत:

Arihant 4

भाजपवर कटाचा आरोप: डिलिमिटेशन हा देशाच्या जनतेकडून सत्ता हिरावून घेण्यासाठी रचलेला भाजपचा कट असून, जो कोणी याला पाठिंबा देईल तो देशाच्या जनतेशी विश्वासघात करत असल्याचे आणि २१व्या शतकातील सगळ्यात मोठा गद्दार म्हणून ओळखला जाईल, असे राऊत यांनी नमूद केले आहे

लोकशाहीवादी पक्षांना आवाहन: प्रत्येक देशप्रेमी लोकशाहीवादी पक्षाने सभागृहात डिलिमिटेशनला ठोकरून काढले पाहिजे, तसेच "इतिहास गद्दारांची नावे सदैव लक्षात ठेवतो; गद्दारीबाबत केलेले खुलासे हवेत विरून जातात," असेही संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे

काँग्रेसची तयारी व बैठक: दुसरीकडे, डिलिमिटेशन बिलाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस देखील अलर्ट मोडमध्ये आली असून, पक्षाने आपल्या सर्व खासदारांना २९ नोव्हेंबर रोजी दिल्लीमध्ये बोलावले आहे व सर्व खासदारांची एकत्र बैठक होण्याची शक्यता आहे