पुणे : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये गुरुवार व शुक्रवारी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
नैऋत्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे देशातील हवामानात पुन्हा बदल होताना दिसत आहे. राज्यात थंडीची चाहूल लागलेली असताना अचानक पुन्हा पावसाचा इशारा दिल्यामुळे आगामी काही दिवस राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे.
राज्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव या आठ जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यातील काही भागांत सकाळी दाट धुके आणि दुपारी बारापर्यंत किंचित थंडी जाणवत होती. राज्यातील आठ जिल्ह्यांना 14 व 15 नोव्हेंबर रोजी हलक्या सरींचा अंदाज दिला आहे. त्यामुळे त्या भागातील किमान तापमानात किंचित वाढ होऊन थंडी कमी होईल, असा नवा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:46 11-11-2024