रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील आरवली ते कुंभारखाणी जाणाऱ्या रस्त्यावर इतर वाहनांना धोका होईल, अशा स्थितीत वाहन उभे करणाऱ्या चालकाविरोधात संगमेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवार, १० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वा. करण्यात आली. मनसूर अहमद मादरे (वय ४७, रा. पिंपळ मोहल्ला, सावर्डे बाजारपेठ, चिपळूण) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे. त्याच्या विरोधात कॉन्स्टेबल सोमनाथ खाडे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, रविवारी सकाळी संशयित चालक मनसूरने आपल्या ताब्यातील महिंद्रा मॅक्स (एमएच-०८-आर-४१४६) गाडी आरवली ते कुंभारखाणी जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर इतर लोकांना व वाहनांना धोका निर्माण होईलल अशा स्थितीत उभी केली होती. त्याच्या विरोधात भारती न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम २८५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:06 AM 12/Nov/2024














