रत्नागिरी : जिल्ह्यात जलसंधारणाची ४ हजार २६७ कामे प्रस्तावित

रत्नागिरी : जिल्ह्यातील १६६ गावांत मृद व जलसंधारण विभाग, कृषी, वन आणि भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या माध्यमातून जलसंधारणाची ४ हजार २६७ कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. जलयुक्त शिवार अभियानात निवडलेल्या गावातील १ हजार ७५२ कामांना तांत्रिक मान्यता मिळाली आहे. त्यापैकी १७६ कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. जलयुक्त शिवार अभियानात यावर्षी जिल्ह्यात १६६ गावांत कामे प्रस्तावित केली आहे. या अभियानातून जलसाठ्यातील गाळ काढणे, नाला खोलीकरण व रुंदीकरणाची कामे करावयाची असल्याने या कामांना प्राथमिकता देऊन ही कामे सुरू करण्यात आली आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:02 PM 12/Nov/2024