रत्नागिरी : मतदान केंद्रावर कर्तव्यावर असणारे पोलीस आणि मतदान केंद्रावर कर्तव्य बजावणाऱ्या अधिकारी-कर्मचारी यांनी आज टपाली मतदान केले.
रत्नागिरी शहरातील दामले विद्यालय येथे या कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदानाची व्यवस्था करण्यात आली होती. इतर नागरिकांना मात्र २० नोव्हेंबर ला मतदानाची संधी मिळणार आहे.
निवडणूक प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या करमचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी कर्तव्यावर असल्याने मतदान करता येत नाही. त्यासाठी टपाली मतदान ही सुविधा निवडणूक आयोगाने उपलब्ध करुन दिली आहे. विधानसभा निवडणूक मतदानाला अजून ८ दिवस शिल्लक आहेत. या कर्मचाऱ्यांनी मात्र आपलं मत नोंदले असून निकाल २३ नोव्हेंबर ला लागणार आहे.
निवडणूक प्रक्रियेत कर्तव्यावर असणाऱ्या करमचाऱ्यांना टपाली मतदान करण्याची अजूनही संधी देण्यात आली आहे. यानुसार १३ तारखेला सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ पर्यंत दामले विद्यालय येथे, १७ ते १९ तारखेदरम्यान प्रांत कार्यालय येथे तर १९ नोव्हेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे टपाली मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. टपाली मतदान पार पाडण्यासाठी सदर सुविधा केंद्रावर ९ मतदान केंद्र तयार करण्यात आली आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:10 12-11-2024













