गुहागर : पालशेतमध्ये पथनाट्यातून मतदान जनजागृती

गुहागर : गुहागर विधानसभा मतदार संघांतर्गत स्वीप उपक्रम अंतर्गत तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी पालशेत येथे पथनाट्याद्वारे मतदान विषयक जनजागृती केली. निवडणूक निर्णय अधिकारी तसेच सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, गटशिक्षणाधिकारी रायचंद गळवे, शिक्षण विस्तार अधिकारी केशव क्षीरसागर, केंद्र संचालक नामदेव लोहकरे यांचे यासाठी मार्गदर्शन लाभले.

नागरिकांनी निवडणुकीत निर्भयपणे कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान करावे म्हणून पालशेत येथे पथनाट्याचे आयोजन करण्यात आले. पथनाट्याचे लेखन व दिग्दर्शन तुषार लोहार यांनी केले. दोन पथनाट्यामध्ये तुषार लोहार, विनोद कदम, श्रीराम चव्हाण, अक्षय लोखंडे, योगेश चिडे, विशाल पवार, रुपाली पठारे, विशाखा पवार, आरती नरके, पूजा मेत्रे, अर्जुन किन्हाळकर, कुलदीप शरणागत, राहुल सातपुते, अर्जुन सावंत, अविनाश ढवळे, चितळे, संगिता फराड, अंजुम शेख, सुषमा गायकवाड, धन्वंतरी मोरे, सोनाली गायकवाड, स्वाती गणेशकर आदी कलाकारांनी सहभाग घेतला.

यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी केशव क्षीरसागर, केंद्रप्रमुख महेंद्र देवळेकर, पंचायत समिती विषय शिक्षक साखरे, गुहागर तालुका अपंग कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दशरथ कदम, गुहागर तालुका अखिल प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष मनोज पाटील, आदर्श शिक्षक दिनेश जागकर, तंत्रस्नेही शिक्षक प्रताप देसले, बाबासाहेब राशिनकर व नागरिक तसेच गुहागर तालुक्यातील सर्व नवनियुक्त शिक्षक उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:14 PM 12/Nov/2024