त्रास देणाऱ्यांची चिठ्ठीत नावं लिहून तरुणाची आत्महत्या

गुहागर : गुहागर तालुक्यातील एलएनजी कंपनीत डिपार्टमेंटचा सुपरवायझर काम करणाऱ्या ३१ वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या भाड्याच्या खोलीत पंख्याच्या हुकाला दोरी अडकवून गळफास घेत आत्महत्या केली. त्याच्या खिशात चिठ्ठी सापडली असून त्यात काहींची नावे नमूद आहेत. त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

गीतेश मुरटे (३१, मूळ रा. कोकण पॅन्ट्री, मुंबई, वरचा पाटबाग गुहागर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो भाड्याच्या खोलीमध्ये राहत होता. सोमवारी दुपारी एक ते दीडच्या सुमारास कंपनीतील काही सहकारी मृत गीतेश मुरटे हा मोबाईल कॉलला प्रतिसाद देत नसल्याने त्याच्या खोलीवर गेले. त्यावेळी खोलीला आतून कडी होती. मात्र, खिडकीतून पाहिले असता तो पंख्याच्या हुकाला दोरीने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला.

या प्रकरणी माहिती गुहागर पोलीस ठाण्यात दिल्यानंतर अडीच वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश करून पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेतला. मृत गीतेश मुरटे याच्या खिशात चिठ्ठी सापडली असून त्यात आत्महत्येमागील कारणांचा उल्लेख आहे. त्यात त्रास देणाऱ्या काहींची नावे नमूद आहेत. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:34 12-11-2024