रत्नागिरी : कार्तिकी एकादशीनिमित्त जिल्ह्याच ठिकाण असलेल्या रत्नागिरी शहरात वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. आज 12 नोव्हेंबर रोजी पहाटे चार पासून उदया सकाळी सहा वाजेपर्यंत वाहतूक व्यवस्थित करण्यात आलेला हा बदल लागू असणार आहे.
रत्नागिरी शहर पो ठाणे हद्दित 12 नोव्हेंबर रोजी मंगळवारी कार्तिकी एकादशी निमित्त विठ्ठल मंदीर देवस्थान रत्नागिरी येथे यात्रोत्सव पार पडणार आहे. उत्सवाकरीता भविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून सदर कार्यक्रमाकरीता सुमारे 10 ते 12 हजार भाविक येण्याची शक्यता आहे. भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे वाहतुक कोंडी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असल्याने सर्व वाहनांना रामनाका ते गाडीतळ, कॉग्रेस भवन नाका दरम्याने प्रवेश प्रतिबंध करणे आवश्यक आहे. व सदर मार्गास पर्यायी मार्ग म्हणून आठवडा बाजार-कॉग्रेस भवन-शेरे नाका गाडीतळ मार्गे शिरगांव या मार्गाने वळविता येईल.
वाहतुकीची कोंडी टाळणेकरीता व कोणताही अनुचित प्रकार घडु नये या करिता रामनाका ते गाडीतळ कॉग्रेस भवन नाका दि. 12/11/2024 रोजी सकाळी 04.00 वा. ते दि. 13/11/2024 रोजी सकाळी 06.00 वा. पर्यत बंद करण्यात येत आहे. तसेच पर्यायी मार्ग म्हणून आठवडा बाजार कॉग्रेस भवन- शेरे नाका गाडीतळ मार्गे शिरगाव या पर्यायी मार्गाने वाहतुक वळविणेत आली आहे. वाहतुकीची कोंडी व कोणताही अनुचित प्रकार घड्डु नये याकरिता योग्य नियोजन व्हावे यासाठी हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
मोटार वाहन अधिनियम 1988 चे कलम 115 प्रमाणे वाहतुक बंद करणेबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या पाण्यानंतर रत्नागिरी पोलीस उपविभागीय अधिकारी मा. पोलीस अधीक्षक, रत्नागिरी यांनी सादर केलेली वस्तुस्थिती विचारात घेऊन चंद्रकांत सुर्यवंशी, अपर जिल्हादंडाधिकारी, रत्नागिरी उपोद्घातातील संदर्भ क्र. 1 व 2 अन्वये प्रदान अधिकारान्वये आदेश देत असल्याचे स्पष्ट करण्यात आल आहे.
वाहतुक नियमनाबाबत जनतेस माहिती मिळावी यादृष्टीने मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 116 प्रमाणे वाहतुकीची चिन्हे उभारणेची कार्यवाही पोलीस विभागाने आजपासून सुरू केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:27 PM 12/Nov/2024













