कणकवली : महाविकास आघाडीच्या सिंधुदुर्गातील उमेदवारांच्या प्रचारार्थ शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभा बुधवार १३ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्गात होणार आहेत.
मविआचे सावंतवाडीचे उमेदवार राजन तेली यांच्या प्रचारार्थ सकाळी १० वा. गांधी चौक सावंतवाडी येथे त्यांची जाहीर सभा होणार आहे. तर कणकवलीचे मविआचे उमेदवार संदेश पारकर यांच्या प्रचारार्थ कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानावर दुपारी २.३० वा. सभा होणार आहे. तसेच कुडाळ-मालवण मतदारसंघाचे मविआचे उमेदवार वैभव नाईक यांच्या प्रचारार्थ सायं. ४ वा. टोपीवाला हायस्कूल मैदानावर सभा होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:42 13-11-2024














