रत्नागिरी : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे कोकणातील थंडीचे प्रमाण वाढू लागले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तरेकडून थंड वारे राज्यात येत आहेत. त्यामुळे प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्रासह मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत तर कोकणकिनारपट्टी भागात किमान तापमानात घट झाली आहे.
उत्तरेकडील वाऱ्याचा प्रवाह पुढील पाच दिवस कायम राहण्याचा अंदाज असल्यामुळे प्रामुख्याने किनारपट्टीवर २२ ते २५ अंश सेल्सिअस दरम्यान किमान तापमान राहणार आहे. कमाल तापमानात फार घट झाली नसली तरीही हवेतील आर्द्रता कमी झाल्यामुळे किनारपट्टी भागात हलक्या थंडीचे वातावरण राहणार आहे.
मंगळवारी रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागात पहाटे थंडीचे प्रमाण वाढले होते. पहाटे तापमान २८ अंश होते. सकाळी यामध्ये हलकी वाढ झाली. दुपारीही तापमानात घट झाली होती.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:49 13-11-2024













