मंडणगड बसस्थानकातून वेळेवर एसटी बस सुटत नसल्याची नागरीकांची तक्रार

मंडणगड : मंडणगड शहरातील एस. टी. बसस्थानकातून तालुक्यात अंर्तगत गावात प्रवाशी वाहतूक करणाऱ्या गाड्या वेळेत सुटत नसल्याने विविध समस्या निर्माण झाल्याची तक्रार नागरीकांकडून करण्यात आली आहे. या विषया संदर्भात प्रतिक गमरे, राहणार शिरगाव, सुशांत मोरे, मंडणगड यांनी आगार व्यवस्थापक यांच्याकडे 8 नोव्हेंबर 2024 रोजी सादर करण्यात आलेल्या तक्रार अर्जातील माहीतीनुसार, मंडणगड आगाराच्या बस बसस्थानाकतून तालुक्यात सोडण्यात येणाऱ्या एसटी बसेस वेळेत सोडल्या जात नाहीत बस वेळेत न सोडल्यामुळे त्यांचा त्रास सर्वसामान्य जनतेला भोगावा लागत आहे.

बस वेळेत न सोडल्या प्रवाशांना त्यांच्या बस स्टॉप पासून गावाकडे अंधारात पायी चालत जावे लागते. रात्रीच्या अंधारात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. बस वेळेत न सोडल्यामुळे नागरीकांना होत असलेला त्रास व समस्यांचा आपण विचार करुन या संदर्भात योग्य उचित कार्यवाही करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. या तक्रार अर्जाचे निवेदनावर प्रतिक गमरे राहणार शिरगाव, सुशांत मोरे, शैलेंद्र मर्चेंडे, महेंद्र बैकर, महेंद्र कदम, सुमित जाधव, नवीन जोशी, विशाल जाधव, कमलेश शिगवण, संतोष बैकर, दगडु साळुंखे यांच्या सह्या आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:17 PM 13/Nov/2024