रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी प्रशासनाचा जोरदार प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी ठिकठिकाणी बॅनर, ध्वनिक्षेपकाद्वारे जनजागृती केली जात आहे. रत्नागिरीतील पेठकिल्ला येथील मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्र येथे प्रशासनाकडून मतदान जनजागृती करण्यात आली. या वेळी पोवाडा, जाखडी व पथनाट्य कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
यातून मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करण्यात आले. या वेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजाराम म्हात्रे, नोडल अधिकारी चेतन शेळके, इंद्रजित चाळके, मयूर बेहेरे, हेमंत पाटील व इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:55 PM 13/Nov/2024













