दापोली : शिवसेना नेते युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे दापोलीचे उमेदवार संजय कदम यांच्या निवडणूक प्रचारार्थ गुरूवारी 14 नोव्हेंबर रोजी दापोलीत येणार आहेत.
दापोली विधानसभा मतदार संघाच्या निवडणूकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार संजय कदम यांच्या निवडणूक प्रचाराची जाहीर सभा गुरुवारी 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता दापोली शहरातील अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयासमोर होणार आहे. शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जाहीर सभेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या वेळी आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत अनेकांचे पक्ष प्रवेशाचे कार्यक्रम होणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:02 PM 13/Nov/2024













