रत्नागिरी : चौपदरीकरणाच्या कामामुळे धुळीचा त्रास

रत्नागिरी : शहराचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साळवी स्टॉप ते हातखंबा या परिसरात सुरू असलेल्या चौपदरीकरणाच्या कामामुळे चालकांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे.

याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ठेकेदाराने पाणी मारून धूळ निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

मिऱ्या-नागपूर राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. गेले काही दिवस कडकडीत ऊन पडू लागले आहे. त्यामुळे साळवी स्टॉप ते हातखंबा मुख्य रस्त्यावरून गाडी चालवताना धूळीचे लोट उठत आहेत. चौपदरीकरणाचे हे काम सुरू असताना एका बाजूला खड्डेमय रस्ता तर दुसऱ्या बाजूला रस्त्याची खोदाई यामुळे नागरिक एकदम त्रस्त झाले आहेत. मोठे ट्रक, अन्य मोठी वाहने जाताना त्यांच्यामागून जाणाऱ्या दुचाकीस्वारांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. एका बाजूला खड्डे आणि धूळ यामुळे वाहनचालक हैराण झाले आहेत. सकाळच्या सत्रात आणि सायंकाळी या परिसरातून मोठ्या प्रमाणात वाहने ये-जा करत असतात. त्यात दुचाकी चालकांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:49 13-11-2024