“बाळ माने यांना मानलं पाहिज” उदय सामंतांच्या वक्तव्याने एकच हशा पिकला

रत्नागिरी : विधानसभा प्रचार आता रंगात आलेला दिसत आहे. उदय सामंतांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतल्याचे पहावयास मिळत आहे. मागील तीन टर्म पराभूत केलेला उमेदवार समोर असल्याने उदय सामंत यांचा पेपर सोप्पा झाल्याचे बोलले जात आहे. गावोगाव प्रचार सभा घेत असताना मिळत असणार प्रतिसाद पाहून आता उदय सामंत यांचा आत्मविश्वास देखील कमालीचा वाढल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर होणाऱ्या सभांमधून केल्या जाणाऱ्या वक्तव्यांवर जोरदार हशा पिकताना दिसत आहे.

नाचणे गावात झालेल्या सभेत उदय सामंत यांनी केलेल्या एका वक्तव्याने उपस्थितांमध्ये जोरदार हशा पिकला. सामंत आपल्या भाषणात म्हणाले कि काही लोकांना निवडणूक लढविण्याची फारच हौस आहे. २००४ ला, २००९ ला आणि २०१४ ला एव्हढ सगळं भोगुनसुद्धा पुन्हा एकदा अपेक्षा आहे. पण मला खात्री आहे की तुमच्या आशिर्वादाने उदय सामंत ला जिंकायची सवय आहे आणि जे कोणी २ नंबर चे उमेदवार आहेत त्यांना कायम पडायची सवय आहे. आजवर झालेल्या निवडणुकीत माझी निशाणी एक नंबरला होती. नियतीच्या मनात हीच इच्छा आहे की मी एक नंबर ला रहावे. बाळ माने पाच वर्ष आपल्यासोबत होते. पण त्यांचे पण कौतुक केले पाहिजे. एखाद्याला आत्मविश्वास किती असतो ? बाळ मानेंना तर मनलच पाहिजे असा उपरोधिक टोल उदय सामंत यांनी हाणताच सभागृहात एकच हशा पिकला. जशी माझी विजयाची हॅट्रिक झाली तशी बाळ मानेंची पराभवाची हॅट्रिक झाली आहे. आता त्यांना पराभवाचा चौकार मारायचा आहे. उदय सामंत तुमच्या आशिर्वादाने सव्वा लाखाचे लिड घेतल्याशिवाय शांत बसणार नाही असा विश्वास उदय सामंत यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला.