रत्नागिरी : मतदानाच्या दिवशी आठवडा बाजार पूर्णवेळ बंद

रत्नागिरी : बुधवार २० नोव्हेंबर रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक मतदानाच्या दिवशी जिल्ह्यातील ज्या ठिकाणी आठवडा बाजार भरणार आहे, अशा सर्व ठिकाणी बाजार व जत्रा अधिनियम, १८६२ चे कलम ५ (ग) मधील तरतुदीनुसार आठवडा बाजार पूर्णवेळ बंद ठेवण्याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी आदेश दिले आहेत. विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत समाविष्ट असलेल्या प्रत्येक मतदाराला मतदान करता यावे. याकरिता मतदान सुरळीतपणे पार पडणे आवश्यक आहे, यासाठी हा आदेश निर्गमित करण्यात आला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:21 AM 14/Nov/2024