संगमेश्वर : नावडी जिल्हा परिषद गट परचुरी लिंगायत वाडीच्या युवकांचा शिवसेनेत प्रवेश

उदय सामंत यांच्या उपस्थितीत प्रवेश

संगमेश्वर : तालुक्यातील नावडी जिल्हा परिषद गट परचुरी लिंगायत वाडीच्या युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे संगमेश्वर तालुक्यात शिवसेनेची ताकत वाढवली आहे. मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेना संगमेश्वर उपतालुका प्रमुख सचिन मांगले आणि प्रसाद सावंत यांच्या पुढाकाराने हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी रुपेश लिंगायत, सत्यविजय लिंगायत, अनंत लिंगायत, समिर लिंगायत, नितीन लिंगायत, विलास लिंगायत, वैभव लिंगायत, सतिश लिंगायत, निखिल लिंगायत, रामु लिंगायत, चैतन्य लिंगायत, साहिल लिंगायत, प्रतिक लिंगायत यांसह अनेक युवकांनी शिवसेनेचा भगवा ध्वज स्वीकारून पक्षात प्रवेश केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:27 AM 14/Nov/2024