कोतवडे मुस्लिमवाडी येथील उदय सामंत यांची प्रचार सभा मोठ्या उत्साहात संपन्न

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी व रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदयजी सामंत यांच्या प्रचाराची सभा शनिवार दिनांक 09 नोव्हेंबर 2024 रोजी कोतवडे मुस्लिमवाडी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

मुस्लिमवाडी येथील या बैठकीला विधानसभा क्षेत्र प्रमुख श्री गजानन उर्फ आबा पाटील, अल्पसंख्यांक तालुकाप्रमुख श्री अल्ताफभाई संगमेश्वरी, विभाग प्रमुख स्वप्निल उर्फ तारक मयेकर, माजी नगरसेवक मुसा काझी, विभाग संघटक व माजी सरपंच तुफिल पटेल, सामाजिक कार्यकर्ते इलियास खोपेकर, मस्जिद कब्रस्तान जमातुल मुस्लिमिन कोतवडे चे अध्यक्ष दिलावरभाई कोतवडेकर, उपाध्यक्ष अश्फाक पटेल, ज्येष्ठ कार्यकर्ते व जमातचे सदस्य रज्जाकभाई कोतवडेकर, खजिनदार सिराज मुल्ला, सदस्य अश्फाक बारगीर, सनम कोतवडेकर, महमदअली कोतवडेकर, हमीद बाणकोटकर, आदी मान्यवर तसेच वाडीतील ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या सभेला श्री मुसा काजी, अल्ताफभाई संगमेश्वरी, आबा पाटील, आणि स्वप्नील मयेकर यांनी संबोधिले.

मुस्लिमवाडी येथील मतदार निवडणुकीमध्ये कायमस्वरूपी ना.उदयजी सामंत यांच्याच पाठीशी उभे असतात. यंदाही एकमुखाने सामंतांच्याच पाठीशी उभे राहण्याचा निर्धार या सभेमध्ये ग्रामस्थांनी व्यक्त केला.

जमात चे सेक्रेटरी मुजीबभाई कोतवडेकर यांनी आपले मनोगत ऑनलाइन व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन उपाध्यक्ष अशपाक पटेल यांनी केले तर आभार प्रदर्शन विभाग संघटक व माजी सरपंच तुफिल पटेल यांनी केले.

मुस्लिमवाडी या निवडणुकीमध्ये उदय सामंत यांना जास्तीत जास्त मताधिक्य देईल ही बाब या सभेतून निश्चितपणाने स्पष्ट झाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:32 AM 14/Nov/2024