चिपळूण : रंगोली ग्रुपच्या वतीने उद्या रांगोळी स्पर्धा

चिपळूण : येथील रंगोली ग्रुपच्या वतीने दि. १५ नोव्हेंबर रोजी त्रिपुरारी पौर्णिमेस सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत रांगोळी स्पर्धा, सायंकाळी ५:३० वा. उद्घाटन सोहळा व सन्मान कार्यक्रम होईल. शहरातील खेंड येथील कै. राधाताई लाड सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. ग्रुपच्या रौप्य महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १५ रोजी सायंकाळी ७ वा. जागर संस्कृतीचा- उत्सव कलागुणांचा हा लोकजागर कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला चिपळूण अर्बन बँकेचे अध्यक्ष मोहन मिरगल विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान चिपळूण नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले भूषविणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:46 AM 14/Nov/2024