श्रीलंकेमध्ये आज संसदीय निवडणूक

कोलंबो : श्रीलंकेमध्ये आज (ता. १४) मुदतपूर्व संसदीय निवडणूक होत आहे.

२०२२ मधील आर्थिक संकटानंतर या देशात प्रथमच निवडणूक होत आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी सुमारे ९० हजार सुरक्षा सैनिक तैनात करण्यात आले आहेत. श्रीलंकेच्या संसदेमध्ये २२५ सदस्य असतात. या निवडणुकीमध्ये देशाचे नवे अध्यक्ष अनुराकुमारा दिसनायके यांच्या नॅशनल पीपल्स पॉवर या पक्षाच्या लोकप्रियतेचा कस लागणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:12 14-11-2024