रत्नागिरी : रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार तथा शिवसेना नेते उदय सामंत यांनी गावागावात सभांचा जोरदार धडाका सुरू ठेवला आहे. आपण रत्नागिरीच्या सामाजिक, औद्योगिक, शैक्षणिक विकासातून रत्नागिरीचा कायापालट करणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.
महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांच्या गावागावात सभा सुरू आहेत. या सभांना जोरदार प्रतिसाद लाभत आहे. राज्याचा उद्योगमंत्री झाल्यानंतर रत्नागिरीत १९ हजार कोटी रुपयांचे प्रकल्प आणण्यात यश आले असून त्यातून ३० हजार युवकांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.
डोर्ले-शिवार आंबेरे येथील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला सामंत यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी नंदकुमार मोहिते, दादा दळी, सुशांत पाटकर, प्रकाश पवार, नारायण आग्रे, तानाजी कुळ्ये, विजय चव्हाण, जितेंद्र शिर्सेकर, संतोष तोडणकर, अमोल मोहिते, सरपंच राजा रोकडे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
गावखडी येथील महायुतीच्या पदाधिकारी बैठकीला उदय सामंत यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी गावखडीच्या विकासाचे काम महायुतीच्या सरकारने केले आहे. त्याचबरोबर भविष्यात गावखडी गावच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करेन, असे आश्वासन सामंत यांनी दिले.
रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी गावातील महायुतीच्या बैठकीतही रत्नागिरीच्या विकासासोबतच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ कधीही बंद होणार नाही. तर या योजनेच्या रकमेत वाढ केली जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी ठाकरे शिवसेनेच्या अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. कुवारबाव येथेही बैठक झाली. राज्याचा उद्योगमंत्री झाल्यानंतर रत्नागिरीत १९ हजार कोटींचे प्रकल्प आणले असून ३० हजार युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यासोबत सामाजिक, औद्योगिक, शैक्षणिक विकासामुळे रत्नागिरीचा कायापालट होत असल्याचे सामंत यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:15 14-11-2024













