रत्नागिरी : तालुक्यातील भोके येथे बुधवारी पहाटे बिबट्याने गोठ्यातील वासरावर हल्ला केल्यामुळे या गंभीर हल्ल्यात वासराचा मृत्यू झाला. महादेव तुळजा रेवाळे (रा. भोके रेवाळेवाडी, रत्नागिरी) यांचा घरापासून काही अंतरावर त्यांचा गुरांचा गोठा आहे. मंगळवारी सायंकाळी नेहमी प्रमाणे त्यांनी सर्व गुरे गोठ्यात बांधून ठेवली होती. बुधवारी पहाटेच्या सुमारास रेवाळे यांना त्यांच्या गोठ्यातून गुरांच्या हंबरण्याचा मोठा आवाज ऐकू आला. गुरांच्या आवाजाने ग्रामस्थही जागे झाल्याने त्यांनी गोठ्याच्या ठिकाणी धाव घेतली असता त्यांना बिबट्याच्या हल्ल्यात वासरू मृत झाल्याचे आढळले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:14 AM 14/Nov/2024













