चाफेरी येथे घरफोडी; पावणे दोन लाखांचा ऐवज लांबवला

रत्नागिरी : तालुक्यातील चाफेरी-पाटीलवाडी येथील बंद घर फोडून अज्ञाताने सोन्याचे मंगळसूत्र आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला.

चोरीची ही घटना मंगळवार १२ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या कालावधीत घडली. याबाबत राजेश रवींद्र पाटील (४३, रा. चाफेरी, रत्नागिरी) यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

मंगळवारी सकाळी ते घघर बंद करून कुटुंबासह बाहेर गेले असताना अज्ञाताने त्यांच्या घराच्या पुढील दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. देवघरातील कपाटाचा दरवाजा उघडून लॉकरमधील १ लाख २० हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र व ६५ हजारांची रोख रक्कम असा एकूण १ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल लांबवला. पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:23 14-11-2024