लाडक्या बहिणी उदय सामंतांच्या पाठीशी भक्कमपणे राहणार

रत्नागिरी : महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रचंड शक्तीप्रदर्शन केले होते. उदय सामंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना सुमारे २० हजार लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिला उपस्थित होत्या. लाडकी बहिण योजनेचा लाभ जिल्ह्यातील बहुसंख्य महिलांना मिळाला आहे.

उदय सामंत यांच्या माध्यमातून मतदारसंघातून या योजनेत नोंदणी करण्यासाठी मेळावे देखील घेण्यात आले होते. ज्या भावाने बहिणीसाठी हि योजना आणली त्या भावाप्रती कृतज्ञता राखणे हे आमचे कर्तव्य असल्याचे मत अनेक लाडक्या बहि‍णींनी व्यक्त केले आहे. या लाडक्या बहिणीनी उदय सामंतांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:40 14-11-2024