खेड : आंबडस येथे जमिनीच्या वादातून मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

खेड : तालुक्यातील आंबडस गवळवाडी येथे जमीन वादातून एका महिला आणि तिच्या मुलाला मारहाण झाल्याची घटना १२ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी उघडकीस आली. या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खेड तालुक्यातील आंबडस गवळवाडी येथे जमीन वादातून एका महिलेला आणि तिच्या मुलाला मारहाण झाल्याची घटना दि. १२ नोव्हेंबर रोजी दुपारी उघडकीस आली. फिर्यादी महिला आणि तिचा मुलगा आपल्या जागेवर साफसफाई करीत असताना शेजारच्या जमिनीचे मालक असलेल्या चार जणांच्या गटाने त्यांच्यावर हल्ला चढवला. या प्रकरणी मनोहर दत्ताराम माने (रा. आंबडस गवळवाडी, ता. खेड जि. रत्नागिरी), आदित्य मनोहर माने (रा. आंबडस गवळवाडी), बबन दत्ताराम माने (रा. आंबडस गवळवाडी) व एक महिला अशा चारजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:33 AM 14/Nov/2024