मुंबई : सुनील केदार (Sunil Kedar) हे मारुतीच्या बेंबीतला विंचू आहेत, असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी टीका केली. शिवसेना स्वतःच्या हिमतीवर गद्दारी करणाऱ्यांशी सामना करण्यास समर्थ असल्याक्षे जाधव म्हणाले.
आमच्या उमेदवाराने गद्दारी केली म्हणून रामटेकमध्ये काँग्रेसने गद्दारी करुन उमेदवार देणे ही पण गद्दारीच असे म्हणत भास्कर जाधवांनी सुनील केदारांवर जोरदार हल्लाबोल केला.
रामटेक या जागेवर शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे कारण, गद्दारी करुन आशिष जयस्वाल हे शिवसेना शिंदे गटात गेले होते. त्यांना धडा शिकवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे भास्कर म्हणाले. दुसऱ्याच्या खांद्यावर बंदुक ठेवून गेम करणारी शिवसेना नाही. आम्ही 27 जागांवर तुम्हाला मदत करत आहोत. तुम्ही मात्र, आमच्या एका जेगावर गद्दारी करता असे म्हणत भास्कर जाधवांनी टीका केली. तुम्ही आम्हाला मदत करत नाहीत, तुम्ही आमच्याशी गद्दारी करत आहे. सुनील केदार हे मारुतीच्या बेंबीत बसलेला विंचू आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:08 14-11-2024













