मंडणगड शहर परिसरात मोकाट जनावरं, कुत्र्यांचा त्रास

मंडणगड : मंडणगड शहर व परिसरात मोकाट कुत्री व गुरांच्या त्रासामुळे परिसरातील नागरिक सध्या त्रस्त आहेत. मंडणगड बसस्थानक, शासकीय धान्य गोदामाचा परिसर, सर्व मुख्य शासकीय-निमशासकीय कार्यालय यांच्या मोकळ्या जागेत मोकाट कुत्र्यांच्या संख्या वाढली आहे.

बदलणारे प्राणी संरक्षण कायदे लक्षात घेता कुत्र्यांचे वाढणारे प्रमाण लक्षात येऊनही नगरपंचायतीसह तत्कालीन ग्रामपंचायतीनेही तीन दशकात कोणतेही विशेष प्रयत्न केलेले नाहीत. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा यासाठी त्रस्त शहरवासियांनी सर्व संबंधितांकडे लेखी व तोंडी मागणी केली आहे. मोकाट कुत्र्यांची दहशत लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व महिलांमध्ये निर्माण झाली आहे. शहरातील कचराकुंड्यावर या कुत्र्यांचा राबता असतो. शहरानजीक असलेल्या कचरा डेपोवर वावरणारी कुत्री ही शहरात दिसून येतात. त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे. मोकाट कुत्र्यांइतकीच मोकाट गुरांची समस्याही तीव्र झाली आहे. शहरास लागून असलेल्या आसपासच्या गावातील शेतकऱ्यांनी आपले पशुधन गोठ्यात बांधून न ठेवल्याने परिसरातील सर्व मोकाट गुरांचा शहरात राबता वाढला आहे. एकत्र फिरणाऱ्या गुरांमुळे वाहतुकीस अडचण निर्माण होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:35 PM 14/Nov/2024