नागपूर : लग्नसराईत ग्राहकांसाठी खुशखबर असून दिवाळीनंतर सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण सुरू आहे. पंधरा दिवसांत दहा ग्रॅम शुद्ध सोन्याचे दर ५,७०० रुपयांनी कमी होऊन गुरुवारी ७४,५०० रुपये आणि चांदीचे दर तब्बल ११ हजार रुपयांनी उतरून ८९ हजार रुपयांवर स्थिरावले.
बुधवारच्या तुलनेत गुरुवारी सोने ९०० रुपये व चांदीचे दर १,८०० रुपयांनी घसरले. शेअर बाजारातील तेजीमुळे दर घसरल्याचे सराफा म्हणाले.
असे घसरले दर
दिनांक सोने चांदी
३० ऑक्टो ८०,२०० १,००,०००
१ नोव्हें ७९,४०० ९६,५००
५ नोव्हें ७८,९०० ९५,५००
११ नोव्हें ७७,३०० ९१,८००
१२ नोव्हें ७५,८०० ९०,५००
१३ नोव्हें ७५,६०० ९०,८००
१४ नोव्हें ७४,५०० ८९,०००
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:54 15-11-2024