रत्नागिरी : शहरातील साळवी स्टॉप येथे ट्रकमध्ये झोपलेल्या चालकाचा आकस्मिक मृत्यू झाला. शहर पोलिसात मृत्यूची नोंद केली आहे. महम्मद शफिक हौसिलदार खान (वय ७०, रा. सम्राट अशोक नगर, चेंबूर, सध्या. रा. साळवी स्टॉप, रत्नागिरी) असे मृत चालकाचे नाव आहे.
ही घटना गुरुवारी (ता. १४) सकाळी साडेसातच्या सुमारास निदर्शनास आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महम्मद खान हे खबर देणार यांच्या कन्स्ट्रक्शन ऑफिसच्या गाडीवर कामाला होते. १० नोव्हेंबरला चालक म्हणून ते कामाला आले होते. बुधवारी (ता. १३) नेहमीप्रमाणे रात्री ११ वाजता ट्रकमध्ये एका हॉटेलच्या समोर गाडी लावून झोपले होते. गुरुवारी खबर देणार हे त्यांना फोन करत होते. मात्र फोन उचलला नसल्याने ट्रक उभा असलेल्या ठिकाणी गेले तेव्हा ते झोपलेल्या स्थितीत आढळले. त्यांना उठविण्याचा प्रयत्न केला पण ते शुद्धीत येत नसल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांना तपासून मृत घोषित केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:22 18-11-2024













