प्रचाराच्या तोफा थंडावल्या; महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. उद्या 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान होत आहे.

मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असून मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झालेली पाहायला मिळत आहे. राज्यातील सर्व 288 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. राज्यातील 9.70 कोटींहून अधिक मतदारांसाठी 1 लाख मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे.

उद्या 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 ते संध्याकाळी 6 या वेळेत एकाच टप्प्यात होणार असून मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं आवाहन करण्यात आले आहे. उद्या मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान होत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. उद्या 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता ‘चक्रीका’ अ‍ॅप मतदान केंद्रांवर लक्ष ठेवणार आहे. निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या सर्व कर्मचाऱ्यांना चक्रिका अ‍ॅप डाउनलोड करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

हा ‘चक्रीका’ अ‍ॅप 19 आणि 20 नोव्हेंबरला सुरू ठेवणे कर्मचाऱ्यांसाठी बंधनकारक करण्यात आले असून या अ‍ॅपमुळे मतदान केंद्रात गोंधळ झाल्यास ते प्रशासनाला तातडीने समजणार असून चक्रिका अ‍ॅपमुळे कर्मचाऱ्यांचे गुगल लोकेशनही निवडणूक आयोगाला समजणार असल्याची माहिती मिळत आहे. या अॅपच्या मदतीने निवडणूक केंद्रात होणाऱ्या प्रत्येक घडामोडीची माहिती प्रशासनाला तत्काळ देण्यात येणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:26 19-11-2024