मुंबई : मला सोडवा माझी चूक झाली मला सोडवा अशी विनंती विनोद तावडे करत आहेत. मला २५ फोन केले आहेत असा दावा केल्यानंतर विरार मध्ये काल झालेल्या पैसे वाटप प्रकरणानंतर आज हितेंद्र ठाकूर यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसत आहे.
मंगळवारी नालासोपारा येथे भाजप आणि बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाल्याचा व्हिडिओ समोर आला होता. आज “बाहरवाले दिखेंगे तो धोयेंगे”, अशी थेट धमकी दिली आहे. काल “बाटेंगे तो पिटेंगे” असं म्हणत होतो. मात्र आज जर कुणी बाहेरच्या मतदार संघातील नेता दिसला तर त्याला मारहाण करणार असल्याचं हितेंद्र ठाकूर यांनी म्हटलं आहे.
काल भिजलेल्या कोंबडी सारखी अवस्था होती
विनोद तावडे यांनी विवांता हॉटेल हे आमदार हितेंद्र ठाकूर यांचा असल्याचा आरोप केला होता, त्याला उत्तर देताना ‘त्यांची काल भिजलेल्या कोंबडी सारखी अवस्था होती, मला सारखं बोलावत होते, माझं हॉटेल असेल तर हॉटेल माझ्या नावावर करून द्या, काहीही आरोप करू नये असा सज्जद दम दिला, भाजपाचे उमेदवार राजन नाईक यांनी कालच्या घटनेनंतर आमचे व्होटिंग वाढतील असा सांगितल्यावर ही पाच कोटी पोहचले वाटत अशी खोचक प्रतिक्रिया दिली. असं हितेंद्र ठाकूर म्हणाले आहेत.
मला सोडवा..माझी चूक झाली…विनोद तावडेंचे २५ फोन
5 कोटी रुपये घेऊन विनोद तावडे आले होते. तसेच दोन डायऱ्या देखील सापडल्या आहेत. यामध्ये पैशांचं वाटप कसं केलं, याची माहिती होती. याबाबत सदर ठिकाणी पोलीस पोहचले आहेत. आम्ही तक्रार केली आहे. परंतु पुढे काय होणार या तक्रारीचं हे माहिती आहे. याचं सरकार आहे, असं हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले. त्याचप्रमाणे मला विनोद तावडे मला सारखे फोन करतायत. मला सोडवा..माझी चूक झाली..मला सोडवा, अशी विनंती विनोद तावडे करत आहेत. विनोद तावडे यांनी मला 25 फोन केले आहेत, असा दावा हितेंद्र ठाकूर यांनी एबीपी माझाशी बोलताना केला आहे.
नेमकं काय घडलं?
बविआच्या आरोपानुसार, विनोद तावडे हे मंगळवारी विरार पूर्वेला असणाऱ्या मनोरीपाडा येथील विवांत हॉटेलमध्ये आले होते. त्यावेळी भाजपचे उमेदवार राजन नाईक आणि भाजपचे काही पदाधिकारी हॉटेलमध्ये आले होते. त्यांच्यात बैठक सुरु होती. त्यावेळी बविआचे काही कार्यकर्ते हॉटेलमध्ये आले. याठिकाणी पैसेवाटप सुरु असल्याचा आरोप बविआच्या कार्यकर्त्यांनी केला. या राड्यानंतर पोलीस घटनास्थळी आले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. यावेळी क्षितिज ठाकूरही घटनास्थळी उपस्थित होते. यावेळी दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध घोषणाबाजी सुरु होती.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:52 20-11-2024