रत्नागिरी : पाऊस पुरता गायब झाल्यानंतर आता उत्तरेकडील शीतलहरींनी कोकणचा ताबा घेण्यास सुरुवात केली आहे. सोमवारची रात्र बऱ्यापैकी गारठ्याची ठरल्यानंतर आता मंगळवारची पहाटही गुलाबी थंडीची चाहूल देणारी ठरली.
गेले अनेक दिवस उकाड्याचे गेल्यानंतर अखेर मंगळवारी रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागात गुलाबी थंडीची चाहूल सुरू झाली आहे. अपेक्षित थंडीच्या प्रतीक्षेत बागायतदारांनी फवारणीचे वेळापत्रक लागू केले नव्हते; मात्र आता थंडी पडू लागल्याने बागायतदार फवारणीच्या तयारीत गुंतले आहेत.
थंडीच्या चाहुलीबरोबर आंबा आणि काजूला येणारा मोहरही आता डिसेंबरपर्यंत येईल या शक्यतेने बागायतदारांनी आंबा हंगामाची बेगमी करण्याची जुळवाजुळव सुरू केली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात बुधवारी रात्री कमाल तापमान २७ ते २८ अंश होते. त्यामुळे वातावरण चांगलेच गारठले होते. पहाटेही तापमान २८.५० ते २९ अंश सेल्सिअस होते. वातावरणात आर्द्रतेबरोबरच दवाचे आणि धुक्याचेही प्रमाण होते. त्यामुळे वातावरणात हलकी थंडी होती. सकाळी दहानंतर तापमानात वाढ झाली; मात्र हलका गारवा कायम होता.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:32 21-11-2024