चिपळुणात विद्यार्थ्यांना सोलर स्टडी लॅम्पचे वितरण

चिपळूण : दुर्गम भागात सतत गायब होणारी वीज, कमी दाबाचा विद्युत पुरवठा यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होतो. ही अडचण लक्षात घेऊन ग्रीन इंडिया इनीशिएटिव्ह आणि विष्णुशक्ती फाऊंडेशनने आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या सीएसआर निधीतून तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मूर्तवडे क्र. १, पिलवली तर्फे वेळंब-वनगेवडी आणि केरेटोक क्र. २ येथील विद्यार्थ्यांना सुमारे १०५ सोलर स्टडी लॅम्पचे वितरण केले आहे.

बालदिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना या सोलर स्टडी लॅम्पचे वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी शाळांची निवड व आयोजन रोटरॅक्ट क्लब ऑफ मुंबई बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सने केले होते. या कार्यक्रमात ग्रीन इंडिया इनीशिएटिव्हचे संस्थापक डॉ. सचिन यशवंत शिगवण, द सोलार मॅन ऑफ इंडिया कंपनीचे सीईओ सुयोग गंगावणे, रोटरॅक्ट क्लब अध्यक्ष मोहित वैद्य, प्रोजेक्ट इंजिनिअर निशांत पाटील तसेच तीनही शाळेचे मुख्याध्यापक संतोष तेतांबे, सुधीर, रांगोळे आणि शिक्षक उपस्थित होते. डॉ. सचिन शिगवण यांनी विद्यार्थ्यांना सोलार स्टडी लॅम्पचा वापर कसा करावा याची माहिती दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:29 AM 21/Nov/2024