खेड : सर्वत्र विधानसभा निवडणुकांची घाईगडबड सुरू असतानाच कोकणातील मतदारसंघात येणाऱ्या चाकरमान्यांची मोठी गर्दी पाहावयास मिळाली. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर ठिकठिकाणी वाहतूककोंडी झाली होती. कोकणातील अनेक चाकरमानी आजही मुंबईत नोकरी, व्यवसायासाठी स्थायिक झाले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करायच्या उद्देशाने थेट मुंबईवरून पहाटेपासून खासगी वाहनांनी निघाले. कोलाड, इंदापूर, माणगांव शहरात तसेच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर लांबच लांब रांगाच रांगा लागलेल्या पाहावयास मिळत होत्या. तसेच रस्त्यालगतचे हॉटेल, ढाबे, सीएनजी पेट्रोलपंप हे तर चाकरमान्यांच्या गर्दने गजबजून गेले.
गणेशोत्सव, होळी सणाप्रमाणे विधानसभा निवडणुकीला मुंबई चाकरमानी खासगी बस, छोटी-मोठी वाहने घेऊन आपल्या मतदारसंघातील उमेदवाराला मतदान करून विजयी करण्यासाठी कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जाताना दिसले. महामार्गावर चौपदरीकरणाचे काम सुरू असल्यामुळे अनेक ठिकाणी वाहनांचा वेग मंदावलेला होता. चाकरमान्यांनी गावात येऊन मतदान करावे, यासाठी प्रयत्न झालेला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:45 PM 21/Nov/2024