पश्चिम बंगालच्या उपसागरात उद्या कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता; महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा बदल होणार?

मुंबई : राज्यात या आठवड्यात वातावरणात मोठा बदल झाला असून थंडी वाढली आहे. राज्याच्या अनेक भागात तापमानात मोठी घट झाली आहे. येत्या काही दिवसांत थंडी आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

दरम्यान, IMD ने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालच्या उपसागरात उद्या(२३ नोव्हेंबर) रोजी कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम राज्यातील हवामानात होऊन २६ नोव्हेंबर पासून पुढे तापमानात बदल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामुळे दक्षिण भारतातील काही राज्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:57 22-11-2024