मुंबई : महाराष्ट्र मध्ये महाविकास आघाडी 100 टक्के सत्तेत येणार असून, आम्ही 165 जागा जिंकू असा विश्वास काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी व्यक्त केला आहे.
पुढच्या 72 तासांत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करु असेही वडेट्टीवार यावेळी म्हणाले. सरकारबद्दल रोष होता, लोकांना बदल हवा होता. सामान्य मतदारांनी राग व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मतदान केल्याचे वडेट्टीवार म्हणाले. अनेक वेळा एक्झिट पोलचे अंदाज चुकतात. 48 तासात मतदार काय निर्णय घेतो हे महत्वाचं असतं असेही वडेट्टीवार म्हणाले.
लाडकी बहीण योजनेबाबात बोलताना वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली. पैसे दिले आणि खिशातून काढून घेतले. मविआ आम्हाला 3000 हजार देणार म्हणून बाहेर महिला मतदानासाठी बाहेर आल्याचे वडेट्टीवार म्हणाले. या निवडणुकीत पैशांचा मोठ्या प्रमाणात वापर झाला आहे. आता निवडणूक संपली आहे. आता हिंदू विषय संपला असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांचा पक्ष वेगळा, त्यांच्यावर आम्ही बोलणार नाही
विनोद तावडे यांच्या संदर्भात काय केलं नक्की? हितेंद्र ठाकूर बोलले की, आम्हाला वरुन आदेश होते. पुढे नाव आलं पाहिजे असेही वडेट्टीवार म्हणाले. महाराष्ट्राचं राजकारण वेगळ्या दिशेने सुरु आहे. 23 तारखेला आम्ही त्यांना मुंबईत येण्याच्या सूचना केल्या आहेत. सर्वांनी फक्त वेळेवर यावं असे वडेट्टीवार म्हणाले. प्रकाश आंबेडकर यांचा पक्ष वेगळा आहे. त्यांच्यावर आम्ही काही बोलणार नाही असे वडेट्टीवार म्हणाले. त्यांना ज्यांना समर्थन करायचं आहे त्यांनी करावं असेही ते म्हणाले.
भाजपने मराठा आणि ओबीसी दोन्ही समाजांना फसवण्याचं काम केलं
नवाब मलिक यांच्याबाबत भाजपने भूमिका स्पष्ट केली पाहिजे. सत्तेसाठी सर्व सुरु आहे. भाजपने मराठा आणि ओबीसी दोन्ही समाजांना फसवण्याचं काम केल्याचे विजय वडेट्टीवार म्हणाले. एकही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका झाल्या नाहीत. राजकीय पोळी भाजण्यासाठी हे सर्व घडवून आणल. प्रणिती शिंदे यांच्या सोलापूर दक्षिणमधील भूमिकेबाबत देखील त्यांना विचारम्यात आले. यावेळी ते म्हणाले की, या वादावार पडदा टाकू पुढे मागे गोष्टी होतात. जागा वाटपात काही प्रसंग ओढवतात. मविआमध्ये याबद्दल काहीही वाद होणार नाहीत असे वडेट्टीवार म्हणाले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:14 22-11-2024