रत्नागिरी : तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने व तायक्वांदो असोसिएशन ऑफ लातूर आयोजित 34 महाराष्ट्र राज्यस्तरीय क्योरोगी व 10 वी महाराष्ट्रा राज्यस्तरीय पूमसे सिनियर तायक्वांदो स्पर्धा दिनांक 28 ते 30 सप्टेंबर 2024 रोजी डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स औसा रोड लातूर येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी या स्पर्धेकरिता रत्नागिरी मारुती मंदिर येथील एस आर के तायक्वांदो क्लबच्या 5 खेळाडूंची रत्नागिरी संघात निवड करण्यात आली आहे.
वेदांत सुरज चव्हाण, सुजल रंजीत सोळंके, अमेय अमोल सावंत, श्रुती रामचंद्र चव्हाण, समर्था सतीश बने हे खेळाडू रत्नागिरी जिल्हा संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या खेळाडूंना तायक्वांदो प्रशिक्षक शाहरुख शेख यांनी मार्गदर्शन लाभले आहे.
या स्पर्धेकरिता एस आर के क्लबला नेहमी भरघोस मदत करणारे शिवसेनेचे शहर प्रमुख बिपिन बंदरकर, महिला आघाडी प्रमुख शिल्पा सुर्वे, तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे खजिनदार व्यंकटेशराव कररा, रत्नागिरी जिल्ह्याचे सचिव लक्ष्मण कररा, कोषाध्यक्ष शशांक घडशी, तायक्वांडो प्रशिक्षक प्रशांत मकवाना मिलिंद भागवत, क्लबचे उपाध्यक्ष अमोल सावंत, कोषाध्यक्ष अंजली सावंत, सदस्य वीरेश मयेकर, निखिल सावंत कांचन काळे यांनी राज्य स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:33 26-09-2024