गणपतीपुळे : अखिल भारतीय आंतर विद्यापीठ क्रॉसकंट्री स्पर्धेच्या महिला संघात रत्नागिरीतील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाची विद्यार्थिनी श्रुती संजय दुर्गवळीची निवड झाली आहे. कु. श्रुती संजय दुर्गवळी या विद्यार्थिनीला महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे, प्रा. कल्पेश बोटके यांचे मार्गदर्शन लाभले. अखिल भारतीय आंतरविद्यापीठ महिला क्रॉसकंट्री स्पर्धेकरिता मुंबई विद्यापीठ महिला श्रुती दुर्गवळी क्रॉसकंट्री संघात निवड झालेल्या श्रुती दुर्गवळी या विद्यार्थिनीला रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे. जिमखाना समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर संस्थेचे सर्व सदस्य तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, तिन्ही शाखांचे उपप्राचार्य, जिमखाना कमिटीचे उपाध्यक्ष डॉ. विवेक भिडे, क्रीडा शिक्षक प्रा. कल्पेश बोटके सर्व प्राध्यापक सहकारी, कर्मचारी, सेवक यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:33 AM 23/Nov/2024














