मुंबई : Maharashtra Election Results 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले होते.
आज राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सध्या महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघांचे कौल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत पाहायला मिळाली. या अटीतटीच्या लढतीत कोण जिंकणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या कलात भाजप महायुतीने बाजी मारल्याचं चित्र दिसत आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकांचे पोस्टल मतमोजणीचे Maharashtra Election Results 2024 कल समोर आले आहेत. यातील बहुतांश मतदारसंघात महायुती आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. आता नुकतंच ईव्हीएम मतमोजणीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात सध्या महायुती 134 जागांवर आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. तर महाविकासआघाडी 126 जागांवर आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. तर 15 जागांवर अपक्ष आघाडीवर असल्याचे दिसत आहे. त्यामुळे राज्यात महायुतीची वाटचाल बहुमताच्या दिशेने सुरु असल्याचे दिसत आहे. यामुळे महाविकासआघाडीला मोठा धक्का बसला आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुती 137 जागांवर आघाडीवर असल्याचे दिसत आहे. यात भाजप 90 जागा, शिवसेना शिंदे गट 26 जागा, अजित पवार गट 21 जागांवर आघाडीवर असल्याचे पाहायला मिळते. तर महाविकासआघाडी 133 जागांवर आघाडीवर आहे. यात काँग्रेस 50 जागा, ठाकरे गट 40 जागा आणि शरद पवार गट 44 जागांवर आघाडीवर आहे.
महायुती : 137 जागा
भाजप – 90
शिवसेना शिंदे गट – 26
अजित पवार गट 21
महाविकासआघाडी : 133
काँग्रेस – 50
ठाकरे गट – 40
शरद पवार गट – 44
इतर – 16
मनसे – 1
बविआ – 1
सपा – 1
राज्यातील जनता कुणाच्या बाजूनं कौल देणार?
यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीकडे फक्त राज्याचंच नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलं. शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांमध्ये झालेली बंडखोरी, यानंतर पडलेली फूट आणि बदलेली राजकीय गणिते यामुळे यंदाच्या निवडणुकीला प्रचंड महत्त्व आहे. राज्यातील राजकारणात उलथापालथ झाल्यानंतर ही पहिली विधानसभा निवडणूक आहे. त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. त्यामुळे मतदारराजा नेमका कुणाला कौल देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
आज महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मतमोजणीची सुरुवात झाली आहे महाराष्ट्रात पुढील पाच वर्ष कुणाची सत्ता असणार? नवा मुख्यमंत्री कोण असणार? मतदार राजा कुणाच्या बाजूनं कौल देणार? हे आज विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर स्पष्ट होईल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:26 23-11-2024














