पुणे : नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच दरवर्षी भारतासह महाराष्ट्रात कडाक्याची थंडी सुरू होते. मात्र, शेवटचा आठवडा सुरू झाला तरी यंदा अवघे तीन ते चार दिवस थंडी पडली. आता पुन्हा पावसाचा अंदाज असल्याने यंदाचा नोव्हेंबर चार दिवासांच्या थंडीविनाच निरोप घेईल, अशी स्थिती आहे. दरम्यान, यंदाच्या नोव्हेंबरसह २०२४ हे वर्षच सर्वाधिक उष्ण ठरले असल्याचा अहवाल जागतिक हवामान संघटनेने प्रसिद्ध केला आहे.
दरवर्षी ऑक्टोबरच्या शेवटी राज्यात थंडीचे वेध सुरू होतात. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उत्तर भारतात पश्चिम चक्रवाढ सक्रिय होतो थंडीला आणि महाराष्ट्रातला सुरुवात होते. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात राज्याची किमान सरासरी तापमान दहा वर्षांच्या खाली जाते. पुणे, नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, मराठवाड्यातील काही भाग हा सतत आठ ते दहा अंशांवर असतो. मात्र, यंदा राज्य गारठले ते नोव्हेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात.
मात्र, अवघे दोन-तीन दिवसच राज्यात थंडी पडली होती. काही शहरांचे तापमानच १२ ते १३ अंशांवर खाली आले. यंदा महावळेश्वरचा पारा १२.३ आहे. बारा अंशाच्या खाली उतरलाच नाही. पुणे शहर राज्यात सतत दोनवेळा १२.२ अंशांखाली आले होते. मात्र, शुक्रवारी पुणे शहराचा पारा बारा पॉइंट सहा अंशांवर गेला. २३ नोव्हेंबरपासून पुन्हा राज्याच्या किमान तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. कारण बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
आजपासून राज्यातील थंडीत होणार घट
जागतिक हवामान संघटनेने दिलेला अहवाल यंदा तंतोतंत लागू होत असून, नोव्हेंबर महिन्यात खूप कमी थंडी राज्यात पडली. राज्यातील बहुतांश शहरांचे तापमान हे सरासरीच्या वरच आहे. गेले तीन ते चार दिवस राज्यात थंडीला सुरुवात झाली होती. मात्र, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ही थंडी पुन्हा शनिवारपासून गायब होत आहे. त्यामुळे नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा हा कमी थंडीचा राहील, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:15 PM 23/Nov/2024














