मुसळधार पावसामुळे पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांचा पुणे दौरा रद्द (PM Modi Pune Visit) करण्यात आला आहे. मोदींच्या हस्ते सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट भूमिगत मेट्रोचं लोकार्पण होणार आहे.

तर स्वारगेट ते कात्रज मेट्रोचं भूमिपूजनही होणार होते. मात्र मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे पंतप्रधानांचा दौरा करण्यात आला आहे. हा दौरा तात्पुरता रद्द करण्यात आला आहे. नवीन तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

परतीच्या पावसाचा प्रचंड जोर असल्याने आणि हवामान विभागाने पुण्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजचा पुणे दौरा रद्दा झाला आहे. येत्या काही तासांमध्ये पुण्यात जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. पंतप्रधान मोदी हे गुरुवारी पुण्यात मेट्रो आणि अन्य विकासकामांच्या उद्घाटनासाठी येणार होते. एस.पी. महाविद्यालयाच्या प्रांगणात मोदींची विशाल सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र,कालपासून पुण्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सभेच्या ठिकाणी प्रचंड चिखल झाला होता. त्यामुळे पर्यायी जागा म्हणून गणेश क्रीडा कला केंद्राच्या सभागृहात मोदींची सभा घेण्याचा विचार सुरु होता. मात्र, या सभागृहातील कार्यक्रम खुल्या मैदानाच्या तुलनेत लहानच होईल. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी पुणे दौरा रद्द केल्याचे समजते. त्यामळे पुणे मेट्रोच्या सिव्हील कोर्ट ते स्वारगेट या टप्प्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रमही पुढे ढकलण्यात आला आहे.

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दौरा अत्यंत महत्त्वाचा

पंतप्रधाना मोदींचा दौरा आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचा होता. महायुती आणि भाजपला या दौऱ्याच्या माध्यमातून पुणेकरांपर्यंत पोहचायचे होते. पर्यायी जागा शोधून छोटा कार्यक्रम करण्यात काहीही अर्थ नाही, अशा प्रकारचे मत आले. तसेच दुपारी मुसळधार पावसाचा अंदाज आयएमडीने दिला आहे. खराब वातावरणामुळे पंतप्रधानांच्या विमानाच्या लँडिंगला देखील अडथळा येऊ शकतो. या सर्व गोष्टींचा विचार करुन हा दौरा रद्द करण्यात आला आहे.

पुण्याच्या काही भागांसाठी रेड अलर्ट जारी

मोदींच्या हस्ते सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट भूमिगत मेट्रोचं लोकार्पण होणार होते. तर स्वारगेट ते कात्रज मेट्रोचं भूमिपूजनही होणार होते. याशिवाय सुमारे 22 हजार कोटींहून अधिकच्या विविध प्रकल्पांची पायाभरणीही पंतप्रधान मोदी करणार होते. दरम्यान पुण्यामध्ये काल तुफान पावसानं हजेरी लावली होती, त्यामुळे पंतप्रधानांच्या सभास्थळी चिखल झाला होता, आजही पुण्याच्या काही भागांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. त्यामुळे पंतप्रधानांच्या दौऱ्यावर पावसाचं सावट होते. त्यामुळे पंतप्रधान मोदींचा दौरा रद्द करण्यात आला आहे.

राज्यातील प्रमुख शहरातील पावसाची आकडेवारी

पुणे – 133 मिमी
मुंबई – 170 मिमी
ठाणे – 97.2 मिमी
रत्नागिरी – 37.9 मिमी
माथेरान – 83 मिमी
महाबळेश्वर – 91.5 मिमी
डहाणू – 69मिमी
संभाजीनगर – 46.3 मिमी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:54 26-09-2024