संगमेश्वर : कासे नं १ व २ शाळेतर्फे संविधान जनजागृती

माखजन : संगमेश्वर तालुक्यातील, जिल्हा परिषदेच्या कासे नंबर १ व २ शाळेत संविधान दिन साजरा करण्यात आला. गावात फेरी काढून घोषणा देत संविधान विषयी जनजागृती करण्यात आली. विविध घोषणा देत लोकशाही मध्ये संविधानाच असलेलं महत्व पटवून देण्यात आले.

या वेळी कासे केंद्राचे केंद्रप्रमुख दत्ताराम गोताड, कासे नं २ चे मुख्याध्यापक मज्जीद काझी, संदीप नेटके, तर कासे नं १ चे मुख्याध्यापक संतोष खेडेकर, अर्चना पाटील, फिरोज शेख, योगेश लिगाडे आदी उपस्थित होते. दरम्यान माखजन परिसरातील सगळ्याच शाळांमध्ये संविधान दिन साजरा करून जनजागृती करण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:09 PM 26/Nov/2024