मंडणगड : मंडणगड नगरपंचायतीने शहरातील बसस्थानकाच्या परिसरात बसविलेला हायमास्टचा दिवा गेल्या अनेक दिवसांपासून बंद असल्याने रात्रीच्या वेळी परिसरातील नागरिकांसह प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. मंडणगड शहरातील बसस्थानक परिसरात हायमास्ट (४० फुटी उंची दिवा) सुरू बसवल्याने पूर्ण परिसर विद्युत रोषणाईने प्रकाशीत होतो. याचा लाभ रात्रीच्या वेळी नागरिकांना होतो; पण अनेक दिवसांपासून हा दिवा बंद आहे. यामुळे नागरिकांसह प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. हा दिवा तातडीने सुरू करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:49 AM 27/Nov/2024














