रत्नागिरी : विज्ञान व तंत्रज्ञान यामधील नवसंकल्पना या संकल्पनेवर आधारित जिल्हास्तर युवा महोत्सव सन २०२४-२५ चे आयोजन ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता नवनिर्माण कॉलेज, मिरजोळे, रत्नागिरी येथे करण्यात आले आहे. युवकांचा सर्वांगीण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागण्यासाठी प्रतिवर्षी राष्ट्रीय व राज्यस्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. राज्यात सन २०२४-२५ या वर्षातील युवा महात्सवाचे आयोजन क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या निर्देशानुसार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी व नेहरू युवा केंद्र, रत्नागिरी (युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय, भारत सरकार) यांच्यावतीने आयोजित केला जाणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:53 AM 27/Nov/2024














