देवरुख : संगमेश्वर तालुका श्री गणेश मूर्तीकार संघटनेचा प्रतिवर्षीप्रमाणे मूर्तिकारांचा वार्षिक स्नेहमेळावा जानेवारीत होणार आहे. या मेळाव्याचे औचित्य साधून मूर्तिकारांची कला विकसित करण्यासाठी राज्यस्तरीय शाडूमाती श्री गणेश मूर्ती स्पर्धा घेण्यात येणार आहेत.
या राज्यस्तरीय स्पर्धेचे परीक्षण व मूर्तिकारांना मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध मूर्तिकार विशाल शिंदे उपस्थित राहणार आहेत. मूर्तिकार आणि व्यावसायिकांना प्रकाशझोतात आणण्यासाठी सलग चौथ्या वर्षी दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्याचादेखील निर्णय घेण्यात आला आहे. हे उपक्रम यशस्वी करण्यासाठी संघटना उपाध्यक्ष जामसांडेकर, सचिव राजेंद्र जाधव, सहसचिव संदीप घडशी, खजिनदार गिरीश भोंदे, सदस्य प्रमोद गुरव, दत्ता शिंदे, नरेंद्र देवरूखकर, उमेश लिंगायत, भाई कुमटेकर सल्लागार युयुत्सू आर्ते, नरेंद्र भोंदे, अशोक घडशी आदी मेहनत घेणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:45 AM 27/Nov/2024














