संगमेश्वर : माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळातर्फे आंतरशालेय सुगम संगीत स्पर्धेचे आयोजन

माखजन : संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळातर्फे जिल्हास्तरीय आंतरशालेय सुगम संगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेच्या कै. पांडुरंग सीताराम लघाटे संगीत कक्षामार्फत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दोन गटांत घेतली जाणार आहे. लहान गट ६ वी ते ८ वी तर मोठा गट ९ ते १२ असा असणार आहे. या स्पर्धेचे हे द्वितीय वर्ष आहे. गतवर्षी या स्पर्धेतून लहान, मोठ्या गटात प्रथम क्रमांक पटकावलेल्या विजेत्यांना या स्पर्धेत भाग घेता येणार नाही. प्रथम फेरी ऑनलाईन असणार आहे. अभंग, भावगीत, भक्तीगीत या गीत प्रकारातील फक्त एका गाण्याचा जास्तीत जास्त ६ मिनिटांचा व्हिडीओ, विशारद गुरव यांच्याशी संपर्क साधून पाठवण्यात यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. व्हिडीओ व अर्ज करण्याची अंतिम तारीख ही ५ डिसेंबर असणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील नवोदित गायक कलावंतांना व्यासपीठ मिळावे, या हेतूने संस्थेने अशा स्पर्धेचे आयोजन केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:53 PM 27/Nov/2024