रत्नागिरी : रेल्वे कर्मचाऱ्याला अस्वस्थ वाटू लागल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. ही घटना शुक्रवार २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.४५ वा. सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली.
विलास भागूराम जाधव (वय ५१, रा. श्रीगणेशा अपार्टमेंट पाडावेवाडी, मिरजोळे, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या रेल्वे कर्मचाऱ्याचे नाव आहे. शुक्रवारी पहाटे ४ वा. सुमारास विलास जाधव यांना अस्वस्थ वाटू लागले, त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर अधिक उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना तपासून मृत घोषित केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:49 PM 30/Nov/2024














