खेड : तालुक्यातील सुकीवली चोरद नदीपात्रात वाहने धुणाऱ्यांचे प्रकार थांबेनासे झाले आहेत. छोट्या-मोठ्या वाहनांसह अजस्त्र क्रेन, आदी वाहने वाहनचालकांडून सर्रासपणे नदीपात्रात धुतली जात असल्याने पाणी दूषित होत आहे. वाहनचालकांवर प्रशासन कारवाईसाठी पुढाकारच घेत नसल्याने साऱ्यांचे फावत चालले असल्याचे चित्र आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्यांवर धोक्याची टांगती तलवार कायमच आहे.
चोरद नदीपात्र आरक्षित करण्यात आले आहे. नातूनगर धरणातून पाणी सोडण्यात येत असल्याने चोरद नदीपात्र बारमाही वाहत असते. या नदीपात्रानजीक परप्रांतीय कामगार रोजगाराच्या निमित्ताने नदीलगतच वास्तव्यास आहेत. हे कामगारदेखील याच नदीपात्रात स्नान व कपडे धूत असतात. नदीपात्रात वाहने धुणाऱ्यांचीही भर पडली असून, दिवसाढवळ्याही सर्रासपणे वाहने धुतली जात आहेत. नदीपात्रात दिवसाढवळ्या तसेच रात्रीच्या सुमारासही सर्रासपणे वाहने धुतली जातात. विक्रेते, भाजीपाला व्यावसायिकांसह अन्य नदीपात्रात वाहने धुण्यास कोणतीही कसर सोडत नाहीत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:22 PM 30/Nov/2024














